दिल्ली :  ग्राहकांना दिलासा! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

\

दिल्ली : वाढत्या माहागाई दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, सरकारकडून पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने करात कपात केल्याना सर्व सामान्यांना हा दिलासा मिळणार आहे, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी ही घोषणा केली आहे. 

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 7 रुपये प्रति लिटरने कमी होतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच यामुळे महसूलात वर्षाला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, केंद्राने पेट्रोलवर 8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील 6 रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत

मोदी सरकारमध्ये महागाई कमी

निर्मला सीतारामन म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून पदभार स्वीकारला, तेव्हापासून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. परिणामी, आमच्या कार्यकाळात सरासरी महागाई दर पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत कमी आहे."



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply