दिल्लीतील हनुमान जयंती मिरवणूकीदरम्यानच्या हिंसाचारप्रकरणी नऊ जणांना अटक

वायव्य दिल्लीतील जहांगीरपुरी भागात शनिवारी संध्याकाळी हनुमान जयंती मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून काही वाहने जमावाने जाळल्याचे माहितीही समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ६ वाजता झालेल्या हिंसाचारात दगडफेक करण्यात आली आणि काही वाहने जाळण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री या घटनेचा तपास सुरू केला. एफआयआर दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असून हा हिंसाचार नियोजित कटाचा भाग होता का? याचाही पोलीस शोध घेत आहेत. 

या घटनेतील मुख्य दोषींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. घरांच्या छतावर दगड साचले आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस ड्रोन फुटेजचा वापर करत आहेत. चकमकीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक दिल्ली पोलिसांसमोर तलवारी उगारताना दिसतात. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी झालेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये पोलिसांनी हाय अलर्टवर जाऊन सखोल गस्त घातली. या घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आठ पोलिस आणि एका नागरिकाचा समावेश आहे. जखमींना बाबू जगजीवन राम मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एका उपनिरीक्षकाला गोळी लागली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेतील मुख्य दोषींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. घरांच्या छतावर दगड साचले आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस ड्रोन फुटेजचा वापर करत आहेत. चकमकीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक दिल्ली पोलिसांसमोर तलवारी उगारताना दिसतात. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी झालेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये पोलिसांनी हाय अलर्टवर जाऊन सखोल गस्त घातली.

दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात घडलेल्या घटनेमुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीवर झालेली दगडफेकीची घटना ही अत्यंत निंदनीय आहे. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे मी दिल्लीतील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. राजधानीमध्ये शांतता राखण्याचे काम हे केंद्र सरकारचे असल्याचेही ते म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply