दिल्लीतील अपघाताची पुनरावृत्ती; 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला कारने नेलं फरफटत

दिल्लीतील हीट अँड रन घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. 31 डिसेंबर रोजी एका बलेनो कारने एका तरुणीला 12 तर 15 किलोमीटर फरफटत नेलं, ज्यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. अशीच आणखी एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून समोर आली आहे. यामध्ये सायकलवर कोचिंगसाठी जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारने धडक दिली. या अपघातानंतर कारने विद्यार्थ्याला तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफरटत नेलं असल्याची घटना समोर आली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ सिनेमा रोडवर अनेक लोकांनी कारचा पाठलाग करून त्या कार चालकाला पकडले. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवाली शहरातील आशा नगर येथील रहिवासी हरिनाम यांचा मुलगा केतन (वय १६) हा शुक्रवारी सायंकाळी लखनौ रोडवर त्याचे मित्र अंश आणि कुणालसह सायकलवरून कोचिंगसाठी जात होता.

घटनेनंतर स्थानिक लोकांनी कारची तोडफोड करत गाडी खाली पाडली. यासोबतच चालकाची धुलाईही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी पोहोचत कार चालकाला ताब्यात घेतलं. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्येही दाखल करण्यात आलं आहे.

ही घटना झबरा पुरवा परिसरात घडली आहे. अपघातात जखमी झालेला केतन हा नववीत शिकतो. तो शुक्रवारी संध्याकाळी सायकलवरुन कोचिंगसाठी जात होता. रस्त्यातच एका भरधाव कारने त्याच्या सायकलला धडक दिली. यामुळे हा मुलगा सायकलवरुन पडला. यानंतर केतन गाडीच्या चाकात अडकला.

केतन गाडीच्या चाकामध्ये अडकल्याचे दिसल्यानंतर स्थानिक लोकांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने गाडी आणखी वेगात पळवली. जवळपास एक किलोमीटर या मुलाला फरफटत नेल्यानंतर कार गर्दीच्या ठिकाणी पोहोचली. तिथे अखेर स्थानिक लोकांनी ही कार थांबवली आणि केतनची सुटका केली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply