दिल्लीकरांची पहाट सुखद, तापमानात घट; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नवी दिल्ली - उष्णतेमुळे होरपळलेल्या दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून सुसाट वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.

त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे झाडे पडल्यामुळे दिल्लीच्या काही भागांमध्ये रस्ते बंद झाल्याची अनेक चित्रेही समोर आली आहेत. पावसामुळे  वीजपुरवठा देखील खंडित जाला आहे. खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

आज दिल्लीत कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मंगळवारीही असेच वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, बुधवार ते शनिवारपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे.

दिल्ली आणि एनसीआर जवळील परिसर लोनी देहाट, हिंडन एएफ स्टेशन, बहादुरगढ, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, रेवाडी, पलवल, बावल, नूह, औरंगाबाद, सिकंदराबाद, चंदौसी, बुलंदशाह, जहंगराबाद , अनुपशहर, बहाजोई, बरेली, शिकारपूर, खुर्जा, पहासू, देबाई, नरोरा, गभना, सहसवान, जट्टारी, अत्रौली, खैर, अलीगढ, कासगंज, नांदगाव, इग्लास, सिकंदर राव, बरसाना, राया, हाथरस येथे पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुरू राहील.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply