दरेकरांना कोर्टाचा पुन्हा दिलासा; अटकपूर्व जामिनावरील निकाल ठेवला राखून

मुंबई: मुंबई सत्र न्यायालयाने प्रविण दरेकर यांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. दरेकर यांना मागेही दिलासा मिळाला होता. त्यांना गेल्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. दरेकर यांना पुन्हा दिलासा मिळाला असून 25 मार्च रोजी निकाल सुनावला जाणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलं होतं. विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधलं होतं. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसंच त्याचं उपजिविकेचं मुख्य साधन हे मजुरीच असेल. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं होतं. प्रवीण दरेकर यांची मालमत्तासुद्धा २ कोटी ९ लाख रुपेय इतकी असून, त्यांच्या नावावर ९० लाख रुपयांची संपत्ती असल्याचंही विधान परिषदेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे अडीच लाख रुपये मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचंही दिसत असल्यानं तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असंही सहकार विभागाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply