‘त्या’ अधिकाऱ्याला काळ्या यादीत टाका; महापालिका निवडणुका होताच मनसे आक्रमक, नेमकं काय घडलं?

image

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून कामाची मुदत संपूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मनसे कार्यकर्ते कपिल पवार यांनी महापालिकेकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बैल बाजार येथील जुनी स्मशानभूमी तोडून आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर कामाची मुदत ३०० दिवसांची असतानाही आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली असून नवीन बांधकामाचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले दिसून येत नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *