त्यांनी पुन्हा स्वगृही यावं आणि लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. नाईक यांनी भाजप सोडून पुन्हा शिवसेनेत यावे आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाईचे रणशिंग फुंकावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद आता तीव्र झाला असून तो टोकाला पोहोचल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत यांच्या मते, भारतीय जनता पक्षात राहून भ्रष्टाचारी प्रवृत्तींशी लढणे गणेश नाईकांना शक्य नाही. कारण या प्रवृत्तींना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा छुपा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात कसे गेले, तसेच रस्ते आणि बागांसाठी आरक्षित असलेले भूखंड कसे दिले गेले, यातील कथित भ्रष्टाचारावर गणेश नाईक यांनी आवाज उचलला आहे. नाईकांनी असेही म्हटले आहे की, जर भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावे लागेल. सध्याच्या सत्तेत राहून नाईकांना ही लढाई लढता येणार नाही, कारण त्यांना सरकारचा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला. शिवसेनेत परतल्यास गणेश नाईकांचा या लढाईत विजय निश्चित आहे, असे संजय राऊत यांनी ठामपणे नमूद केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *