तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?

तेजस ठाकरे यांना तब्येत ठीक नसल्याने एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वतः दररोज संध्याकाळी रुग्णालयात जाऊन तेजस यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस ठाकरे यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत, म्हणजेच आज किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार सायंकाळी त्यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची सखोल तपासणी केली असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *