तुकडेबंदी धाब्यावर बसवणाऱ्या मावळ-हवेलीतील सहा बड्या प्लॉट विकसकांवर गुन्हे दाखल

नियमबाह्यपणे केलेल्या या प्लॉटची विक्री झाली तर विकत घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सहा प्लॉट विकसकांच्या विरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गुन्हा दाखल केला आहे. या सहा विकासकांनी मावळ व हवेली तालुक्यात मोठ्याप्रमाणात जमीनी घेऊन तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करीत प्लॉट पाडून विक्री सुरू केली होती. तिरूपती ग्रूप (स्वामी समर्थ डेव्हालपर्स) मोजे सोमाटणे ता. मावळ, तिरूपती ग्रूप (तिरूपती स्पर्श डेव्हालपर्स) मोजे, सोमाटणे ता. मावळ, तिरूपती ग्रूप (साई गणेश डेव्हापर्स) मौजे शिरगाव ता. मावळ, तिरूपती ग्रूप (गोल्हडन तिरूपती डेव्हलपर्स) मोजे, शिरगाव ता. मावळ, नमो पार्क, मौजे उरूळी कांचन ता. हवेली, व रोव्हा व्ह्यू पार्क, मांजरी बुद्रुक, ता. हवेली या सहा प्लॉट विकसकांचा याता समावेश आहे. नियमबाह्यपणे केलेल्या या प्लॉटची विक्री झाली तर विकत घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. शिवाय भविष्यात प्लॉट विकत घेतलेल्या या ग्राहकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळेत ही कारवाई होणे अपेक्षित होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply