डोंबिवली : लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली: लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली आहे. वेदांत जाधव असं या सहा वर्षीय चिमुकल्याचं नाव असून त्याच्या मृत्यूने पालकांवर शोककळा पसरली आहे. डोंबिवलीमधील सागर्ली गावातील ही घटना असून घटनास्थळी मानपाडा पोलीस दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ही इमारत अनधिकृत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामामुळे चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला का असा प्रश्न निर्माण होता आहे. (6 years old boy drowned in a pit dug for an elevator)

लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ पुरेशी सुरक्षा व्यवस्था असती तर आज एका चिमुकल्याचा असा हकनाक बळी गेला नसता. बांधकाम करत असताना शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच हे बांधकाम जर खरंच अनधिकृत असेल कर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई का नाही केली? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांचा सपाटाच लागलेला आहे. मात्र, पालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून अपघाती मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. याअगोदरही काही महिन्यांपूर्वी सागाव परिसरात अशीच घटना घडली होती. १९ जानेवारी २०२२ ला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी सागाव परिसरातच घडली होती. त्या १० वर्षीय मुलाचं नाव सत्यम मौर्य असं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply