ठाणे : भाजपचे नेते गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपुर्व अर्जावर बुधवारी सुनावणी

ठाणे : भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. महिलेस धमकवणे आणि बलात्कारा प्रकरणी गणेश नाईक यांनी ठाणे न्यायायालयात अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी दाखल केला होता. त्यावर आज (शुक्रवार) सुनावणी हाेणार हाेती. दरम्यान नाईक यांच्या वकीलांकडून आणखी एक नवे वकीलपत्र सादर करण्यात आले असून आज न्यायालयात काेणताही युक्तीवाद झाला नाही. येत्या २७ एप्रिलला पुढील सुनावणी हाेणार आहे.

आज ठाणे न्यायालयाच्या बाहेर माध्यमांशी बाेलताना पीडित महिलेच्या वकील लूसी मेस्सी म्हणाल्या आज कुठलाही युक्तिवाद झालेला नाही. त्यांच्याकडून (नाईक) एक नवीन वकीलपत्र सादर झाले. पाेलीसांबाबतच्या प्रश्नांना पाेलीसच उत्तर देऊ शकतील असेही मेस्सींनी नमूद केले.

दरम्यान फिर्यादी दीपा चव्हाण यांनी न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्याकडे जाणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या आम्हांला न्याय मिळावा यासाठी सरकारची मदत घेणार आहाेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply