जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट एप्रिलमध्ये भारतात

जेरुसलेम : इस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत-इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना तीस वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त त्यांचा हा दौरा असेल. गेल्या वर्षी जूनमध्ये इस्राईलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नफ्ताली बेनेट यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा असेल. दोन एप्रिल ते पाच एप्रिल या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्री आणि अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. संशोधन आणि तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सायबर, कृषी आणि वातावरण बदल अशा क्षेत्रांमधील सहकार्य वाढवून संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे सूत्रांनी सांगितले. ‘माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारताचा दौरा करण्यासाठी मी उत्सुक आहे. मोदींनी इस्राईलबरोबरील संबंधांना नवी सुरुवात करून दिली आहे,’ असे ट्विट बेनेट यांनी केले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply