जुन्नर :  शिवरायांच्या त्रिमितीय रांगोळीची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

जुन्नर : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिमितीय रांगोळीची इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक दर्शन फुलपगार यांनी दिली. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर ही विश्वविक्रमी रांगोळी माजी आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आली आहे. ही फक्त रांगोळी नसून आज्ञापत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व राजमुद्रा विविध रंगाच्या रांगोळीतून साकारण्यात आली आहे. महेंद्र मेटकरी,भाग्यश्री देशपांडे, शेखर दरदरे यांचेसह ३० कलाकारांनी सलग तीन दिवस २३० x १२० फूट (२७,६०० चौरस फूट) क्षेत्रात ही रांगोळी साकारली. यासाठी यासाठी १६ हजार किलो रांगोळी लागली आहे. त्रिमितीय रांगोळीची इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे प्रमाणपत्र संयोजकांना देण्यात आले आहे. रांगोळी कलाकार महेंद्र मेटकरी, भाग्यश्री देशपांडे, शेखर दरदरे यांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.ही त्रिमितिय रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक तसेच अनेक शिवभक्त गर्दी करत आहेत.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply