जुन्नर – तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा शिवनेरीवर दिमाखात साजरा

जुन्नर : शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे आज सोमवार ता.२१ रोजी किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे, मनसेचे उपनेते अमित ठाकरे,पावनखिंडचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, कल्याणचे मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपच्या महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव  वकील वर्षां डहाळे, आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुंबईतील इस्त्राईलच्या वाणिज्यदूत कोब्बी शोशानी ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवाई देवीला अभिषेक व महापूजा झाली. शिवाईमंदिर ते शिवजन्मस्थाना पर्यत पारंपा रिक वाद्यांच्या गजरात पालखी छबिना मिरवणूक काढण्यात आली. शिवजन्मस्थानी पारंपारिक पध्दतीने पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवकुंज येथे राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *