जालना : घरातून निघून गेलेल्या मुलीचा जीव घेतला; निर्दयी बापाचं कृत्य असं आलं उघडकीस

जालना : रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी घरी परतलेल्या १७ वर्षीय तरुणीला गळफास देऊन तिची जन्मदात्या पित्याने आणि काकाने हत्या केली. इतकेच नाही तर तिचा परस्पर मृत्यदेह जाळल्याची धक्कादायक घटना चंदणझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव शिवारात घडलीय. 

सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे असे हत्या करण्यात आलेल्या १७ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती तीन दिवसांपूर्वी रागाच्या भरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. त्यानंतर काल दुपारी ती पुन्हा घरी परतली. यानंतर तिच्या वडिलांनी जाब विचारत समाजात आमची बदनामी केली; असे म्हणत रागात तिला मारहाण करत भावाच्या मदतीने कडुलिंबाच्या झाडाला गळफास देऊन तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर दोघा भावांनी तिचा मृत्यदेह रात्री परस्पर जाळून अंतविधीही केला. या घटनेची माहिती आज चंदणझिरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनस्थळी धाव घेऊन वडील संतोष भाऊराव सरोदे, काका नामदेव भाऊराव सरोदे या दोघा भावांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आपणच मुलीला गळफास देऊन हत्या केल्याची कबुली देत तिचा मृत्यूदेह जळल्याची ही कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संतोष सरोदे व नामदेव सरोदे यांच्‍या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक झलवार हे करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply