जळगाव : यासारखे दुर्दैव नाही, आधीच दौरे केले असते तर ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

जळगाव : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावे लागत आहे. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती; असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

राज्‍यात एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार गेले आहेत. यासोबतच नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवक यांच्‍यासमवेत कार्यकर्ते देखील शिंदे गटात येत आहेत. यामुळे शिवसेना वाचावी याकरीता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्‍य ठाकरे शिवसेना शाखांवर दौरे करत आहेत. याबाबत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्‍तव्‍य केले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्‍य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते; तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असा टोला शिंदे गटात सहभागी झालेले जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply