जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना अभय? सूत्रांनुसार अहवालात काय?

पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना अभय मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, खारगे समितीने दिलेल्या अहवालात पार्थ पवार यांचा या प्रकरणात थेट संबंध नसल्याचे म्हटले आहे. व्यवहारावर त्यांची सही नसल्यामुळे मुद्रांक शुल्क नियमानुसार ते थेट जबाबदार नाहीत, असे अहवालात नमूद आहे. हा अहवाल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, लवकरच तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल.

या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. यात तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांचा समावेश आहे. अमिडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी, कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, महसूल विभागातील नोंदी तपासल्या असून, संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाबही नोंदवले आहेत. या प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *