Sanae Takaichi and Narendra ModiImage Credit source: Reuters Photo and Tv9 Bharatvarsh
जपानच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जपानमधील संसंदीय निवडणुकीत पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक या पक्षाने आपला ठसा उमटवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. नेतृत्व आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे पक्षाचा पराभव होईल, अशी निवडणुकीदरम्यान चर्चा पाहायला मिळत होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून होतं. त्यामुळे सानाए ताकाइची यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र भ्रष्टाचार आणि इतर सर्व मुद्द्यांचा या निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही. सानाए ताकाइची यांच्या नेतृत्वात पक्षाने बहुमताचा आकडा गाठला. यासह पक्षाने दणदणीत कामगिरी करुन बाजी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन, पोस्टमध्ये काय म्हटलंय?
सानाए ताकाइची यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सानाए ताकाइची यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सानाए ताकाइची यांचं निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन. आपली विशेष रणनिती आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते”, असा उल्लेख करत मोदींनी सानाए ताकाइची यांचं कौतुक केलंय.
तसेच मोदींनी भारत-जपानच्या मैत्रीचाही या पोस्टमध्ये उल्लेख केलाय. “तुमच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्रीला आणखी उंचीवर नेणं सुरू ठेवू याची मला खात्री आहे”,असा विश्वास मोदींनी या पोस्टद्वारे व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट
Congratulations Sanae Takaichi on your landmark victory in the elections to the House of Representatives!
Our Special Strategic and Global Partnership plays a vital role in enhancing…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2026
आकड्यांचं गणित
कनिष्ठ सभागृहाची सभासदसंख्या ही एकूण 465 इतकी आहे. तर 233 ही मॅजिक फिगर आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने हा बहुमताचा आकडा गाठला. विशेष आणि उल्लेखनीय बाब अशी की मतदान संपल्यानंतर फक्त नि फक्त 2 तासांतच हा आकडा गाठला. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा हा आतापर्यंतचा ऐतिहासिक विजय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
बहुमत गमावलं-युती तुटली, तरीही मिळवला विजय
सानाए ताकाइची यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये आपल्या पक्षाच्या नेतृत्वाच्या निवडणुकीत बाजी मारली होती. या विजयामुळे त्यांचा विश्वास दुणावला होता. त्यानंतर सानाए ताकाइची यांनी तब्बल 36 वर्षांनंतर निवडणुकीची घोषणा केली. जनमताचा कौल मिळवणं हा या निवडणूक घेण्यामागील प्रमुख हेतू होता.
सानाए ताकाइची यांचा निवडणूक जाहीर करण्याचा हा निर्णय मोठा राजकीय डाव असल्याची चर्चा होती, त्याचं कारण म्हणजे एलडीपीने दोन्ही सभागृहात आवश्यक बहुमत गमावलं होतं. तसेच कोमेतो पक्षासोबतची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली युतीही तुटली होती. मात्र या अशा अनेक अडचणी आणि संकटांवर मात करत सानाए ताकाइची यांनी न डगमगता आपल्या नेतृत्वात एकतर्फी विजय मिळवला.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

