चार्ल्स फर्ग्युसन यांचा कॉलम:डीपफेक, चुकीच्या माहितीच्या महापुरात सत्य कुठे शोधायचे?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधीकधी काही घटना आपल्याकडून विशेष प्रतिसादाची‎मागणी करतात. जागतिक युद्धे, अण्वस्त्रांचा शोध आणि‎शीतयुद्धाच्या वेळी असेच झाले होते. जनरेटिव्ह‎एआयलासुद्धा मी याच श्रेणीत ठेवतो. असे असूनही‎एआयवर होणारी चर्चा अनेकदा वेगवेगळ्या चौकटीत‎विभागलेली असते. तंत्रज्ञ या मुद्द्यावर नक्कीच बरोबर‎आहेत की एआय सर्वकाही बदलेल- आणि वेगाने‎बदलेल. पारंपरिक धोरणात्मक आराखडा त्याच्याशी‎पाऊल जुळवू शकत नाही. पण ज्याप्रमाणे युद्ध केवळ‎सेनापतींवर सोडले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे‎एआयलासुद्धा त्याच्या शोधकर्त्यांच्या भरवशावर सोडले‎जाऊ शकत नाही- मग ते कितीही प्रतिभावान का‎असेनात.‎ बहुतेक एआय तंत्रज्ञ आणि उद्योजक अत्यंत आशावादी‎आहेत. ते वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी प्रगती, शारीरिक‎कष्टाचे निर्मूलन, उत्पादकतेत तीव्र वाढ आणि जागतिक‎समृद्धीची कल्पना करतात. ते अशा परिणामांची अपेक्षा‎करतात कारण त्यात त्यांना नफ्याची शक्यता दिसते. पण‎त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर त्यांचा अढळ विश्वास‎आहे, हेही एक कारण आहे. नुकतीच मी एका प्रतिभावान‎तरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी चर्चा केली, ज्यांच्या‎एआय स्टार्टअपचे मूल्य आधीच अनेक अब्ज डॉलर्सवर‎पोहोचले आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की, एआय‎डीपफेक आणि चुकीच्या माहितीची समस्या त्यांना‎भेडसावते का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “मुळीच नाही.‎तुम्हाला फक्त हे तपासायचे आहे की एखादी गोष्ट‎विश्वसनीय स्रोताकडून आली आहे का.” पण हे शक्य‎आहे का? जेव्हा त्यांना एखादा फोटो, दस्तऐवज,‎ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ पाठवला जाईल, तेव्हा‎हे तथाकथित विश्वसनीय स्रोत ते खरे आहे की नाही हे‎कसे ओळखतील? आणि जेव्हा अशा हजारो प्रतिमा‎किंवा व्हिडिओ येतील, ज्यातील प्रत्येक दुसऱ्याचा खंडन‎करत असेल, तेव्हा ते काय करतील? सोशल मीडियावर‎प्रसिद्ध झालेली कोणतीही सामग्री खरी आहे की नाही हे‎आपल्याला कसे कळणार? आणि जेव्हा बातम्यांच्या‎स्रोतांनाही प्रत्येक गोष्टीच्या सत्यतेची कष्टपूर्वक तपासणी‎करावी लागेल, तेव्हा ते समकालीन आणि फायदेशीर कसे‎राहतील? अचूक भाकिते करण्यात मुख्य प्रवाहातील‎अर्थशास्त्रज्ञांची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे.‎त्यांनीच मोठ्या विश्वासाने आपल्याला सांगितले होते की‎जागतिक करणाचा सर्वांना फायदा होईल; नियम कमी‎केल्याने वित्तीय संकट निर्माण होणार नाही; विकासाचे‎अर्थशास्त्र आफ्रिकेच्या समस्या सोडवेल आणि‎आपल्याला मक्तेदारीबद्दल काळजी करण्याची गरज‎नाही. पण मग भ्रष्टाचाराची समस्यादेखील आहेच. या‎वर्षांमध्ये अनेक प्रमुख अर्थशास्त्रज्ञांच्या उत्पन्नाचा मोठा‎वाटा कॉर्पोरेट देयकांमधून आला आहे. नक्कीच, काही‎अपवाद आहेत. अॅन्थ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎डारियो अमोदेई यांनी एआयच्या संधी आणि धोके या‎दोन्हीबद्दल समज आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे.‎अर्थशास्त्रातील नोबेल विजेते सायमन जॉन्सन यांनी एका‎लेखात सांगितले होते की कशा प्रकारे अमेरिकन वित्तीय‎उद्योगाने फेडरल धोरणावर ताबा मिळवून मंदीला जन्म‎दिला होता. पण अर्थशास्त्रज्ञांची एकूण कामगिरी विश्वास‎निर्माण करत नाही, विशेषतः तेव्हा, जेव्हा अनेक‎अर्थशास्त्रज्ञ या तंत्रज्ञानाचे संभाव्य फायदे आणि धोके-‎दोन्ही कमी लेखताना दिसतात.‎ मी एक खास गोष्ट लक्षात घेतली आहे. मी जितक्याही‎श्रेष्ठ एआय संस्थापकांना भेटलो आहे, त्यापैकी अनेक‎पदवी किंवा पदवीपूर्व स्तरावरच शिक्षण सोडून आलेले‎आहेत (खरोखर, 200,000 डॉलरच्या थेईल‎फेलोशिपसाठी तर ही अट आहे की प्राप्तकर्त्यांकडे‎विद्यापीठाची पदवी नसावी!). याउलट, पारंपरिक‎धोरण-निर्मिती एका जड, नोकरशाही यंत्रणेवर अवलंबून‎असते, ज्याची मोडकळीस आलेली यंत्रणा एआयसमोर‎कुठेच टिकत नाही. नक्कीच, आपण विद्यापीठे, विचार‎गट किंवा सरकारी धोरण-निर्मितीची यंत्रणा तर संपवू‎शकत नाही. पण असाधारण परिस्थितीत असाधारण‎प्रतिसादाची अपेक्षा करतो. अनेक धोरणात्मक मुद्द्यांवर‎संथ आणि पारंपरिक प्रक्रिया कदाचित स्वीकारार्ह असेल-‎पण एआयच्या बाबतीत तसे करता येणार नाही.‎(@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *