ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदाराच्या गावातील सत्ता गेली; 'मविआ' चा धक्का

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : राज्यात रविवारी विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. आज (साेमवार) एकेक ग्रामपंचायतीचा  निकाल जाहीर हाेऊ लागले आहेत. काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाणी एनसीपी तसेच काॅंग्रेसचे प्राबल्य दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास रायगडमध्ये धक्का बसला आहे. 

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे विजयी झाले आहेत.

महामुणकर यांचा विजय हा आमदार भरत गाेगावले आणि त्यांच्या गटास धक्का मानला जात आहे. महामुणकर यांना विजयी घाेषित करताच त्यांच्या समर्थकांनी ढाेल ताशांच्या गजरात जल्लाेष केला. 

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply