गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला, मृतांचा आकडा ६० वर, अनेकजण जखमी

गुजरातमधील मच्छू नदीत केबल पूल कोसळला : गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचं स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे ७० हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढलं आहे. संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्राथमिक तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. यानंतर रविवारी सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply