महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ लवकरच एक मोठा बदल करणार आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे. यानुसार एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपयांचा डिजीटल प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
नव्या बसेसचा ताफा: प्रवाशांची प्रतीक्षा संपणार
कोरोनापूर्व काळात एसटीकडे सुमारे १९,००० बसेस होत्या. मात्र निवृत्त होणाऱ्या बसेस आणि नवीन खरेदी अभावी ही संख्या १२,६०० पर्यंत खाली आली होती. आता शासनाने टप्प्याटप्प्याने बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरु करण्यात येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून ३,००० नवीन ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस ताफ्यात येतील. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.
तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागासाठी १०० मिडी बसेसही दाखल केल्या जाणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक (Premium) बसेसची खरेदी केली जाणार आहे.
आर्थिक गणिताची जुळवाजुळव
सध्या एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे. मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. “बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न वाढून एसटी या वर्षाखेर आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षेसाठी ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपये खर्चून डिजीटल सुरक्षा कवच तयार करण्यात येत आहे. राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी (बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा) एकूण ७,०३५ कॅमेरे बसवले जातील. यात पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. मुंबईत उभारलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे काम पाहत आहे.
दरम्यान सध्या एसटीने दररोज ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन ८,३०० बसेस ताफ्यात आल्यानंतर हे लक्ष्य ७० ते ७५ लाखांपर्यंत नेण्याचे महामंडळाचे मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


