कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्यावर; केवळ इतक्या रुपयात मिळणार

नवी दिल्ली: कोरोनावरील बुस्टर डोस घेण्यासाठी आता ६०० रुपये मोजावे लागणार नाहीत. सीरम इंस्टीट्यूटने कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्याहून कमी करण्यात आली आहे. या संदर्भात अदर पुनावाला यांनी आज घोषणा केली आहे. कोविशिल्ड लस आता खासगी रुग्णालयात ६०० रुपयांऐवजी २२५ रुपयांना मिळणार असल्याती घोषणा पुनावाला यांनी शनिवारी केली आहे.

सरकारने १८ वर्षावरील सर्वांना बुस्टर डोस देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लस १८ वर्षावरील सर्वांना खासगी रुग्णालयात कोविशिल्ड लस घेता येणार आहे. या लसीकरणाच्या एक दिवस अगोदरच अदर पुनावाला यांनी कोविशिल्डचे दर कमी झाल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून १८ वर्षावरील सर्वांना १० तारखेपासून लसीकरणाच्या सूचना दिली आहे. ज्यांचे वय १८ वर्षे आहे आणि ज्यांनी कोरोना  लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाली आहेत, त्यांना आता बुस्टर डोस मिळणार आहे. पहिले दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत, तिच लस बुस्टर डोसमध्ये दिली जाणार आहे. जर एखाद्याने कोविशिल्ड (Covishield) चा पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल, तर त्या व्यक्तीला बुस्टर डोस कोविशिल्ड दिला जाईल.

कोविडचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत दिला जात आहे. त्याचबरोबर देशात १२ मुलांना कोरोनाची लस देण्याचे कामही वेगाने सुरू आहे. देशात आतापर्यंत एकूण कोविड लसीकरण १८६ कोटींहून अधिक झाले आहे. देशात कोरोनाचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०० कोटींच्या जवळ पोहोचली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply