कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

कोल्हापूर : अॅड . गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुंबईत पोहचले असतानाच सदावर्ते यांच्यावतीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला हाेता. दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर या अर्जावरील पुढील सुनावणी येत्या गुरुवारी (ता.21) घेण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सदावर्ते यांच्यावर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात कलम 153 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याचे तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे  दिलीप पाटील यांनी केली हाेती. त्यानूसार सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षण  विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्तेंनी बेकायदेशीरपणे पैसे जमवले तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सदावर्ते यांच्या वतीने अॅड. पीटर बरदेस्कर तर फिर्यादीच्या वतीने अॅड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला. यावेळी सरकारी वकील ऍड विवेक शुक्ल यांनी युक्तिवादासाठी आवश्यक कागदपत्र मिळाली नसल्याचं न्यायालयास सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दाेन दिवसानंतर म्हणजे 21 एप्रिलला घेण्यात येईल असे स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply