कोणाच्या सांगण्यावरुन कोण सभा घेतंय हे कळतंय; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. यावर बोलताना संजय राऊत यांनी हा अयोध्येचा मुद्दा पॉलिटिकल मुद्दा नाही असं म्हटले आहे. शिवसेना नेहमीच अयोध्येत जात आली आहे. आम्ही श्रध्देसाठी तिकडे जातो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्यांनी जावे, असंही राऊत म्हणाले. कोणी कुठेही सभा घेऊ द्या, या देशात लोकशाही आहे. सभा घ्यायला बंदी नाही. त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची आहे ते घेऊ दे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. यावर आज संदय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. विक्रांत घोटाळ्याचा आता मुंबई पोलीस तपास करत आहेत. ईडी किंवा इन्कम टॅक्स पेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी उभे रहा व त्यासाठी सोमय्या गेले असतील आता हा पोलीस तपासाचा भाग आहे. ईडी (ED) किंवा इन्कम टॅक्सपेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम आहेत, असंही राऊत म्हणाले.

राजभवनमध्ये जाणाऱ्या पैशांना कुठे पाय फुटले ते कोणाच्या खात्यात गेले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करतील याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्याने महाराष्ट्र झालेला नाही. राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल, असंही राऊत म्हणाले.

काल भाजपने मुंबईत पोलखोल अभियान घेवून शिवसेनेवर टीका केली. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. 'जे स्वतः उघडे झाले आहेत, त्यांच्याकडून पोल-खोलची काय अपेक्षा करत आहात अशी टीका राऊत यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply