केदारनाथमध्ये अनियंत्रित हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग; डीजीसीएने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

चार धाम यात्रेसाठी यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर नियंत्रण सुटल्याने जमिनीवर कोसळण्यापासून थोडक्यात बचावले. खराब हवामानामध्ये केदारनाथ मंदिराच्या हेलिपॅडवर खासगी हेलिकॉप्टर उतरत होते. हे प्रकरण ३१ मे पर्यंतचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चार धाम मार्गावर कार्यरत सर्व हेलिकॉप्टर ऑपरेटरना सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा दिला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत, जर निष्काळजीपणा आढळला तर हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल.

केद्रानाथचा हा व्हिडिओ ३१ मेचा आहे. हेलिपॅडवर प्रवासी हेलिकॉप्टर उतरणार होते, मात्र काही कारणांमुळे ते हेलिकॉप्टर  थेट जमिनीवर आदळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर वेगाने जमिनीकडे जात असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळताच लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले.

डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘केदारनाथ हेलिपॅडवर नुकतीच एक गंभीर घटना घडली, ज्यामध्ये खराब हवामानात हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले गेले असून डीजीसीएकडून चौकशी केली जात आहे. या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत डीजीसीएने वैमानिकांना चार उंच मंदिरांवर, विशेषत: केदारनाथमध्ये, जेथे दृश्यमानतेची समस्या आहे तेथे उड्डाण करताना आणि उतरताना जोरदार वाऱ्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. जर वारा जास्त असेल तर उतरण्याचा किंवा उड्डाण करण्याचा प्रयत्न करू नका.

डीजीसीएने मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की केदारनाथ खोऱ्यात जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टरने पुरेसे अंतर राखले पाहिजे. याशिवाय, हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपनीला हे तपासून घ्यावं लागेल की वैमानिक अशा वातावरणात हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे. याशिवाय ऑपरेटर कंपनी वैमानिकांना आराम मिळतो आहे का हे ही तपासून घेईल.

दरम्यान, केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी हेलिकॉप्टरने केदारनाथला जाण्यासाठी खूप वाट पाहावी लागत आहे. गेल्या २९ दिवसांमध्ये ८८७३ हेलिकॉप्टर फेऱ्यांमधून ४९,३६७ प्रवासी केदारनाथला पोहोचले आहेत, तर ४८,४५४ प्रवासी दर्शन घेऊन परतले आहेत. मात्र यानंतरही दोन ते तीन दिवसांनी हेलिकॉप्टर सेवेची तिकिटे मिळत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply