
किरकटवाडी - नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आज पुन्हा पालिकेच्या अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या ताफ्याने धडक दिली. पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून संयुक्तपणे सुरू असलेल्या सदर कारवाईत 'काहींना' जाणीवपूर्वक अभय देण्यात आल्याचे दिसल्याने या कारवाई विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचा संताप पाहून अगोदर पोलीस व नंतर पालिका प्रशासनाने कारवाई न करता खडकवासला गावातून काढता पाय घेतला.
1 एप्रिल रोजी पालिका प्रशासनाने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. आज दि 4 एप्रिल रोजी नांदेड सिटी गेट समोरुन पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. व अतिक्रमण कारवाईसाठी आलेला पालिकेच्या वाहनांचा भला मोठा ताफा खडकवासल्यापर्यंत येऊन पोहोचला. खडकवासला येथील नागरिकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता व मोजणी न करता मनमानी पद्धतीने प्रशासन कारवाई करत असल्याने अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच काहींच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याबाबतही नागरीकांनी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई अर्धवट सोडत काढता पाय घेतला.
पालिकेच्या कारवाईदरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुणे शहर पोलीसांचा मोठा फौजफाटा सोबत होता. नांदेड फाट्याच्या पुढे ग्रामीण पोलीसांची हद्द असल्याचे काही नागरिकांनी आलेल्या पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीस अधिकारी संभ्रमात पडले. नागरिक संतापले आहेत, वादावादी झाली तर काय करायचे? हा भाग आमच्या हद्दीत नाही, आम्ही चाललो असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हणत पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्याही निघून गेल्या.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

