कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू; वाचविण्यासाठी गेलेल्याचा शोध सुरू

आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) : इसापूर धरणाच्या भाटेगाव शिवारातील उजव्या कालव्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याला वाचविणाऱ्या पाण्यात उतरलेला वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता.१६) घडली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील सौरभ तुळशीराम ठुसे (वय २७), नयन गजानन चौथे (२५) अंकित दामोदरराव टाले (२८), नीलेश महिंद्रदास देवमुरार व वाहनचालक प्रशांत हे कारने तुळजापूरला दर्शनासाठी जात होते. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भाटेगाव शिवारातील इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याजवळ ते जेवणासाठी थांबले. तेथे त्यांनी जेवणाची तयारी केली होती. नीलेश देवमुरार हा कालव्यात हात धुण्यासाठी गेला. त्यावेळी पाय घसरून तो कालव्याच्या पाण्यात पडला. आरडाओरड ऐकून त्याचा वाचविण्यासाठी कारचालक प्रशांतने कालव्यात उडी मारली. पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेल्याचे तीन मित्रांनी सांगितले. काही ग्रामस्थांनी माहिती देताच आखाडा बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड हे सकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी शोध सुरू केला असता नीलेशचा मृतदह आढळला. प्रशांतचा उशिरापर्यंत शोध सुरूच होता. फौजदार बोडले, जमादार भगवान वडकिले, बाबर पठाण, अडकिने आदींनी घटनास्थळी पाहणी केली. पाचही जण नागपूर येथील खासगी कंपनीत नोकरीला होते. देव दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याची तिघा मित्रांनी पोलिसांना सांगितले.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply