काँग्रेसचे मिशन 2024; सोनिया गांधी अन् प्रशांत किशोर यांच्यात खलबतं!

नवी दिल्ली: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन लोकसभा आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे अनेक बडे नेतेही पक्ष सोडून गेले आहेत. भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी काँग्रेस आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सहारा घेत आहे. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत काँग्रेस नेते कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, एके अँटनी, अंबिका सोनी आणि रणदीप सुरजेवाला यांचाही सहभाग आहे.

प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये गेल्या चार दिवसांतील ही तिसरी बैठक आहे. पहिली बैठक १६ एप्रिल आणि त्यानंतर दुसरी बैठक १८ एप्रिलला झाली. या बैठकांमध्ये सोनिया गांधीही उपस्थित होत्या. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत अशा आणखी दोन बैठका होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. माहिती देताना केसी वेणुगोपाल म्हणाले की प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रोड मॅप दिला. प्रशांत किशोर यांची काँग्रेसची भूमिका आठवडाभरात कळेल, असे ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply