औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागितले; शिंदे गटातील आमदाराच्या मुलाकडून थेट हातपाय तोडण्याची धमकी!

औरंगाबाद : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील नेते तसेच मंत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडत आहे. आता त्यामध्ये आमदाराच्या मुलाचीही भर पडली आहे. औरंगाबादेतील शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांच्या मुलाने एका केटरिंग व्यावसायिकाला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

केटरिंग व्यावसायिकाने वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागितले म्हणून आमदार संजय सिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांनी थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं बोललं जातंय. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक केटरिंग व्यावसायिक एका व्यक्तीला फोन लावतो. साहेबांनी आपल्याला ४० हजार रुपये द्यायचं सांगितलं पण मुळात २० हजार रुपयेच दिले असल्याचं व्यावसायिक म्हणतो. यावर उत्तर देताना समोरील व्यक्ती म्हणतो, साहेबांनी जेवढे पैसे सांगितले आहे तेवढेच पैसे तुला दिले आहे, आता यानंतर नाही भेटायचं.

पुढे बोलताना व्यावसायिक म्हणतो, भाऊ अजून २० हजार रुपये बाकी आहे. यावर समोरचा व्यक्ती म्हणतो, डोकं खराब करायचं नाही, उपकार केले आहेत का तू? यावर व्यावसायिक म्हणतो, भाऊ अशी भाषा वापरू नका माझ्या कामाचे पैसे आहेत, ते देऊन टाका. यावर समोरचा व्यक्ती म्हणतो कोणत्या कामाचे पैसे आहेत? यावर व्यावसायिक म्हणतो कामाचे पैसे घ्यायला मी ऑफिसवर येतो, यावर समोरील व्यक्ती हा परत आलात तर तुझे हातपाय तोडेन, अशी धमकी देताना दिसून येत आहे.

दरम्यान, हा व्यक्ती दुसरा कुणी नसून शिंदे गटातील आमदार संजय सिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट हे असल्याचं बोललं जातंय. याबाबत सिद्धांत सिरसाट यांना विचारलं असता, सदरील व्यावसायिक हा सात वर्षानंतर ब्लॅकमेलिंग करीत पैसे मागत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply