औरंगाबाद : राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता; नांदगावकर, सरदेसाईंसह कार्यकर्ते सभास्थळी रवाना

औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आज पार पडणार आहे. या नियोजित सभेनं यापूर्वीच महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. सुरुवातीला राज यांच्या सभेला परवानगी देण्यात आली नाही, पण आता १६ अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांनी सध्या उपस्थित केलेला भोंग्यांचा मुद्दा, महाविकास आघाडी सरकारवरील सडकून टीका आणि हिंदुत्वाचा फुंकलेला नवा हुंकार यापार्श्वभूमीवर ते आज काय बोलतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

  • मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंसह मनसेचे कार्यकर्ते सभास्थळी रवाना झाले आहेत.
  • अभिजीत पानसे : राज ठाकरे आजच्या सभेत जे आदेश देतील त्याची तंतोतंत पालन केलं जाईल. तसेच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी गृहमंत्रालयाची असेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन सरकारनं करावं.
  • राज ठाकरेंच्या सभेपूर्वी आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. भीम आर्मी आणि वंचित बहुजन आघाडीनं राज ठाकरेंच्या या सभेला विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून निघालेल्या आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
  • सभास्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून या सभेसाठी येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार इथं घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply