औरंगाबाद: मी सर्व पुस्तकं वाचली, पवार साहेब तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले- राज ठाकरे

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा ठाकरे आज राज ठाकरेंनी राज्यातील अनेक विषयावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. औरंगाबादचं मूळ नाव खडकी, आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच, एक देवगिरीचा किल्ला दुसरी पैठण. महाराष्ट्र समूजन घेणं गरजेचं आहे, तो समजून घेऊ. जो जो इतिहास विसरला त्याच्या पायखालचा भूगोल सरकला असे राज ठाकरे म्हणाले.

आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. पवार साहेब, जाती जातीमध्ये जो भेद करतायेत त्यामुळे महाराष्ट्रात दुही माजत आहे अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचावित. मी सर्व पुस्तकं वाचली आहेत तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले आहे असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

सभेअगोदर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुषाश देसाई यांनी राज ठाकरेंवरती टीका केली होती. आजची होणारी सभा ही सुपारी सभा आहे या सुपारी सभेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणाऱ्या 14 मे च्या सभेत समाचार घेतील असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे ते औरंगाबादमधील शिवसैनिकांच्या प्रशिक्षण सभेत बोलत होते. लेका दुपारपर्यंत झोपून राहतोस अन पहाटच्या भोंगाच्या काय त्रास करून घेतोस असा टोमणाही देसाई यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply