औरंगाबाद मध्ये दस्त नोंदणीसाठी शनिवारीही सुविधा

औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षापासून नवीन रेडी रेकनर दर वाढतील, स्टॅंप ड्युटी वाढेल या धसक्याने दस्त नोंदणीसाठी सब रजिस्टर कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. मात्र ३१ मार्चपूर्वी दस्त निष्पादन व शासकीय चलन भरणाऱ्या पक्षकारांना पुढील चार महिन्यापर्यत कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय दस्त नोंदणी करता येणार आहे. तसेच शनिवारी (ता.१९) व शनिवारी (ता.२६) सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सब रजिस्टर कार्यालये सुरू राहणार आहेत. विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक सोहम वायाळ यांनी सांगितले की, जे पक्षकार ३१ मार्च २०२२ पूर्वी दस्त निष्पादन करून ( देणार व घेणार दस्तावर स्वाक्षरी करणे) शासकीय चलानचा भरणा (मुद्रांक शुल्क व नोंदणी फी) यांचा भरणा चलानद्वारे ३१ मार्च २०२२ पूर्वी केल्यास अशा दस्ताची नोंदणी दस्त निष्पादित केल्यापासून पुढील चार महिन्याच्या आत सद्याच्या रेडीरेकनरच्या दरावरच दस्त नोंदणी केली जाऊ शकते. नवीन रेडीरेकनर जरी लागू झाले तरी त्यांना अतिरिक्त भुर्दंड लागणार नाही. याशिवाय पक्षकारांना सोयीचे व्हावे म्हणून दररोज एक ते दोन तासाचा वेळ नोंदणीसाठी वाढवून दिला जात आहे. तसेच औरंगाबाद शहरात सुटीच्या दिवशी शनिवारी (ता.१९) आणि शनिवारी( ता. २६) सब रजिस्टर कार्यालय सुरू असणार आहे. त्यामुळे पक्षकारांनी सब रजिस्टर कार्यालयात ३१ मार्चपूर्वी नोंदणीसाठी औरंगाबाद, बीड, जालना येथील नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply