औरंगाबाद मधील चिकलठाणा येथील कचरा डेपोला आग

चिकलठाण : चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने खासगी कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराचे कर्मचारी रात्री १२ वाजेपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करत होते. त्यानंतर ते झोपी गेले. दरम्यान पहाटे अडीचच्या सुमारास ज्याठिकाणी कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या होतात, तिथे प्रचंड आग लागली. हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

अग्निशमन विभागाने चार गाड्यांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. दिवसभर दोन गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा केल्यानंतर सायंकाळपर्यंत ही आग आटोक्यात आली. दरम्यान, घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सौरभ जोशी यांनी पहाटे कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.

त्यांनी सांगितले की, ज्याठिकाणी शहरातून आलेल्या कचऱ्याच्या ट्रक रिकाम्या होतात, त्याठिकाणी आग लागली होती. त्याला लागूनच बेलींग मशिन आहेत. बेलींगमशिनचे या आगीमुळे नुकसान झाले आहे. तसेच प्रकल्पाच्या शेडला देखील फटका बसला आहे.सध्या सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद पडली असली तरी ओल्या कचऱ्यावर मात्र प्रक्रिया सुरू आहे. आगीची पाहणी केल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना माहिती देण्यात आल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply