औरंगाबाद : पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने समर्थक संतप्त ; भाजप कार्यालयात घोषणाबाजी, वस्तूंची नासधूस, तिघांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : भाजपच्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने चिडलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागातील कार्यालयात गोंधळ घातला. भाजप व विरोधी पक्ष नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयातील वस्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सचिन डोईफोडे, योगेश खाडे, सुनील चव्हाण या तिघांविरोधात वेदान्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विधान परिषेदच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. पंकजा मुंडे यांनीही तशी इच्छा गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात व्यक्त केली होती. दिलेल्या संधीचे सोने करता येते असेही त्या म्हणाल्या होत्या. काव्यात्म शब्दकळा वापरत त्यांनी स्वपक्षीयांवर टीका केली होती. आक्रमक स्वभावाचे दर्शन घडवीत विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले होते. मराठवाडय़ातील इतर मागासवर्गीय समाज संघटित करून तो भाजपच्या मागे उभा करण्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केलेले प्रयत्न व त्यांच्यानंतर गर्दी जमविण्याची शक्ती असणारे आणि प्रत्येक जिल्ह्यात समर्थक असणाऱ्या भाजपच्या नेत्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा क्रमांक वरचा आहे. मात्र भाजपमधील अंतर्गत राजकारणातून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply