औरंगाबाद नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नव्हता; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'किमान समान कार्यकमामध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता. संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर आम्हाला कळलं असल्याचं पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नामांतराचा निर्णय घेतला तो आमच्या किमान समान कार्यक्रमामधील नव्हता, शेवटच्या मंत्रीमंडळात हा निर्णय घेतला, मात्र, याबाबत आमच्याशी संवाद नव्हता हा निर्णय घेतल्यावर आम्हाला कळालं. तसंच मंत्रीमंडळाच्या कामाची पद्धत असते. मुख्यमंत्र्य़ाचा निर्णय अंतिम अस तो. तिथे मतं व्यक्त केली जातात. मात्र, निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. शिवाय त्यावेळी देखील या निर्णयाविरोधात मतं व्यक्त केली गेली होती. असही पवारांनीयावेळी सांगितलं.

दरम्यान, आपण मध्यावधी निवडणुका होतील, असं म्हटलं नव्हत. येणाऱ्या दोन वर्षात पूर्ण तयारी करण्याबाबत बोललो होतो. बंडखोरांनी जो निर्णय घेतला त्याला काहीही आधार नाही, त्यामुळे लोकांना काहीतरी सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निधी दिला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं असल्याचा आरोप त्यांनी बडखोर आमदारांवर केला.

पुढच्या काळात निवडणुका एकत्र लढण्याबाबत माझी व्यक्तिगत इच्छा आहे, पण बाकी पक्षांशी अजून बोललो नाही. उद्याच्या निकालाबाबत माझ्याही मनात शंका आहे असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार असावं म्हणून सर्व पक्षांनी मला आग्रह केला होता. पण माझं मत असं होतं, की जबाबदारीचे हे पद स्वीकारू नये, जर समजा निवडणुकीत यश आले असते, तर माझ्या सारख्याला एका जागी बसने शक्य झालं नसतं असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. तर सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ होते त्यांची अस्वस्थता जरा कमी झाली असेल असा टोलाही त्यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply