औरंगाबाद : कपडे धुण्यासाठी म्हणून गेल्या पण घरी परतल्याच नाही; दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद भिलदरी शिवारातील पाझर तलावामध्ये बाल दिनाच्या दिवशी दोन सख्या बहिणीचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. दोन्‍ही बहिणींच्‍या मृत्‍यूनंतर कुटूंबाने आक्रोश केला. 

काजल पवार, मीनाक्षी पवार या तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळा नंतरही दोन्ही मुली घरी आल्या नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय गाव शिवारातील पाझर तलावाकडे गेले. तेथे तलावाच्या शेजारी कपडे दिसून आले. त्यामुळे तलावात त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन मृत मुलींना नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नागत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दोन्हीही सख्या बहिणींना तपासून मृत घोषित केले. याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *