औरंगाबाद :अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाला मृत्यूनं गाठलं, १६०० मीटर धावताना नेमकं काय घडलं?

औरंगाबाद : केंद्र सरकारने अग्निवीर सैन्य भरतीची घोषणा केल्यानंतर देशातील तरुण संधीचं सोनं करण्यासाठी काबाडकष्ट करत आहेत. औरंगाबाद शहरात अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांची भरती सुरू आहे. या भरतीत तरुण मुलं जीवाची बाजी लावत मैदानी चाचणीसाठी तयारी करत आहेत. मात्र, या भरतीत १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना एका तरुणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर या तरुणाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. करण नामदेव पवार (20) असं मृत तरुणाचं नाव आहे. करण कन्नड तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी कन्नड तालुक्यातून करण औरंगाबाद शहरात आला होता. १६०० मीटरचा फेरा पूर्ण करत असताना चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यानंतर घाटी रग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण पवार हा तरुण भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबादला आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply