औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा; प्रवाशांना लुटलंं

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर आज पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दौलताबाद-पोटूळ दरम्यान घडली असल्याने प्रवासी घाबरले आहेत. या घटनेत प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवली आणि त्यानंतर रेल्वेत घुसून लुटमार केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली असून वीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच रेल्वे अडवून प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते.

घडलेली घटना अशी की, मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशनकडून औरंगाबादकडे येत होती. यावेळी देवगिरी एक्स्प्रेसवर दौलताबाद-पोटूळ जवळ येण्यापूर्वीच दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधून रेल्वे थांबवली. यानंतर चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल हिसकावून घेतला. यावेळी रेल्वेवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तात्काळ कोणतीही हालचाल करता आली नसल्याने या दरोडेखोरांनी डाव साधला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून एकाच महिन्यातील ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे. रेल्वेत होणाऱ्या अशी घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षततेचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply