ऐतिहासिक क्षण! पंतप्रधान नेहरूंनंतर लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला 'तिरंगा'

काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.यावेळी राष्ट्रगीत गात राहुल गांधी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर श्यामलाल गुप्ता यांची प्रसिद्ध गीत, विजय विश्व तिरंगा प्यारा हे गायले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती.

आता ती जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. आज कडक बंदोबस्तात राहुल गांधी यांनी लाल चौकात ध्वजारोहण केले. राहुल श्रीनगरमधूनच आज 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.पांढरा टी-शर्ट परिधान करून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सकाळी 11.45 वाजता पुन्हा पदयात्रेला सुरुवात केली.यादरम्यान हजारो काँग्रेस समर्थक राष्ट्रध्वज आणि काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन राहुल आणि प्रियंका यांच्यासोबत रॅलीमध्ये चालताना दिसले.

1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला होता. पंडित नेहरूंनंतर लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.तिरंगा फडकवताना राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. दरम्यान, राहुल आणि प्रियांकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस-प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply