लहानपणीचे उन्हाळ्याचे दिवस आजही अनेकांना आठवत असतील. त्या काळात टेबल फॅन हेच थंडावा मिळवण्याचे प्रमुख साधन होते. माझ्या बालपणी घरात उषा कंपनीचा एक टेबल फॅन होता. तो उजव्या बाजूला फिरत खोलीच्या टोकापर्यंत हवा पोहोचवत असे. तेथे वडील झोपलेले असत. नंतर तो डावीकडे वळून माझ्यापर्यंत यायला बराच वेळ घेत असे. मला तेव्हा खात्री वाटायची की घरातील कर्ते पुरुष असल्याने फॅनलाही वडिलांनाच जास्त हवा द्यायची असून माझे महत्त्व कमी असल्याने तो मला कमी हवा देतो. त्यामुळे मी वडिलांना झोपायची जागा बदलण्याची विनंती केली. पण फॅनही जणू चलाख निघाला. या वेळी तो डावीकडे येताना मंद झाला व पुन्हा उजवीकडे जाण्यास वेळ घेऊ लागला. कधी-कधी मी झोपण्याऐवजी फॅनच्या हालचालीबरोबर फिरत राहायचो आणि आई-वडिलांपर्यंत जाणारी हवा अडवायचो. ते मला म्हणायचे, ‘असे किती वेळ चालणार? ये आणि झोप.’ त्याच काळात वडिलांनी मला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता, ‘गैरसोय सहन करण्याची क्षमता विकसित कर. ती आयुष्यात खूप उपयोगी पडेल.‘ मात्र तेव्हा मी त्यांच्या या सल्ल्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पुढे मोठा झाल्यावर वयाच्या 18व्या वर्षी मुंबईत एका बहुराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. वातानुकूलित कार्यालयात बसून काम करताना मला दोन गोष्टी वारंवार आठवत असत. एक म्हणजे वडिलांचा सल्ला व दुसरे म्हणजे नागपूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयातील त्यांचे कामाचे ठिकाण. तेथे उकाडा, गोंगाट व सतत गर्दी असायची. कर्मचारी सतत रुमालाने घाम पुसत काम करत असत. माझ्या वातानुकूलित कार्यालयाबाहेर पडल्यावर मुंबईच्या स्थानिक रेल्वेने प्रवास करणे मला आवडत नसे. त्या काळात वातानुकूलित स्थानिक गाड्या नव्हत्या. त्यामुळे मी सामान्य डब्याऐवजी प्रथम श्रेणीचे मासिक तिकीट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वडिलांनी पुन्हा तोच सल्ला दिला, ‘गैरसोय सहन करण्याची क्षमता विकसित कर.’ आणि या वेळीही मी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. काही वर्षांनी माझ्या मुलीचा जन्म झाला. 1991 मध्ये मी घरात खिडकीत एसी बसवला. माझे म्हणणे होते की लहान मुलाला आरामदायी वातावरण मिळायला हवे. मात्र उन्हाळ्यातही वडील नातीला त्या खोलीबाहेर घेऊन जात आणि म्हणत, ‘मुलांना थोड्या का होईना गैरसोयीच्या वातावरणातदेखील वाढू द्यायला हवे.’ तेव्हाही मी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. मला वाटत होते की मी माझ्या मुलीला माझ्या बालपणापेक्षा अधिक सुविधा देऊ शकतो. मात्र अनेक वर्षांनी वडिलांच्या विचारांचे खरे महत्त्व लक्षात आले. आजची एक पिढी अगदी छोट्या कारणांमुळे निराश किंवा संतप्त होताना दिसते. त्यामागे एक कारण म्हणजे अनेक पालकांनी मुलांना प्रत्येक सोय उपलब्ध करून दिली. लहानपणापासून सर्व सुविधा मिळालेल्या मुलांना अडचणींचा सामना करण्याची सवय राहत नाही. अलीकडेच एका मित्राच्या मुलाने केवळ आई ठरलेल्या वेळेत बाजारातून परत आली नाही आणि घराचे दार उघडले गेले नाही म्हणून काचेच्या खिडकीवर ठोसा मारला. त्यात त्याचा हात जखमी झाला. मित्राने मला तत्काळ येऊन त्याला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्या मुलाला ‘फ्रिक्शन मॅक्सिंग’ची सवय नव्हती. ‘फ्रिक्शन मॅक्सिंग’ म्हणजे दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक काही छोटे अडथळे किंवा आव्हाने स्वीकारणे. तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या अतिसुविधांपासून स्वतःला काही प्रमाणात दूर ठेवून मानसिक ताकद वाढवणे हा त्याचा उद्देश असतो. उदाहरणार्थ- छापील पुस्तक वाचणे, विना जीपीएसचे वाहन चालवणे किंवा तयार खाद्यपदार्थांऐवजी स्वतः स्वयंपाक करणे. अशा कृतींमुळे एकाग्रता, संयम आणि काही साध्य केल्याची भावना विकसित होते. ही संकल्पना पडद्यांमुळे निर्माण होणारा मानसिक थकवा, तात्काळ समाधानाची सवय व अधीरता यांवर उपाय मानली जाते. जाणीवपूर्वक एखादी कठीण वा वेळखाऊ प्रक्रिया स्वीकारल्याने व्यक्ती वास्तवाशी अधिक घट्ट जोडली जाते. त्यामुळे निराशा व वैफल्य कमी होण्यास मदत होते.
फंडा असा की... मुलांना केवळ सुविधा देणे पुरेसे नाही. त्यांना दैनंदिन जीवनातील काही असुविधाही स्वीकारायला शिकवावे. नेहमीच सोपा मार्ग निवडण्याऐवजी अडचणींना सामोरे जाण्याची सवय लावा. त्यामुळे अनिश्चित परिस्थितीतही ते हसतमुख आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- भंडारा-साकोली महामार्गावर काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू
- गोव्यात विरोधकांचे 'नशीब' फुटके; अंतर्गत मतभेदांमुळे गोवेकरांचा अपेक्षाभंग.
- १८ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्राची मान्सूनची प्रतीक्षा कधी संपणार?
- पेट्रोल गाडीचे जुने रेकॉर्ड दाखवा अन् इलेक्ट्रिक बाईकवर मिळवा ३०,००० पर्यंत कॅशबॅक; 'किल द पेट्रोल बिल' ऑफरचा ३० जूनपर्यंतच लाभ!
महाराष्ट्र
- भंडारा-साकोली महामार्गावर काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू
- १८ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्राची मान्सूनची प्रतीक्षा कधी संपणार?
- महावितरणचा ग्राहकांना '४८ तासांचा' इशारा! स्मार्ट मीटर सक्तीच्या संदेशामुळे ग्राहकांमध्ये खळबळ; नेमकं काय आहे कारण?
- तमिळनाडू: लज्जास्पद! डेटवर गेलेल्या विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना बेड्या.
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- तमिळनाडू: लज्जास्पद! डेटवर गेलेल्या विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना बेड्या.
- कतारचा इराणसोबत 'गुप्त करार'? रस लाफ्फान गॅस प्रकल्प वाचवण्यासाठी उत्पादनात कपातीची ऑफर!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड



























Subscribe to my channel
