उल्हासनगर – अखेर दोन वर्षांनंतर अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या आरोपीला अटक

उल्हासनगर - हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दितील भालगाव येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष देऊन मोहम्मद शेख याने दोन वर्षा पुर्वी पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत होते. पोलिसांच्या या अथक तपासाला अखेर यश आले आणी दोन वर्ष मुलीला पळवून नेणारा नराधम अटक झाला. तसेच अल्पवयीन मुलीसह तीचं बाळ देखील सुखरूप महाराष्ट्रात पोहचलं आहे.

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्ददीत असलेल्या भाल गांव येथील राहाणारे हसिपुर रहेमान यांनी २० जून २०२० रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार हिल लाईन पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार कलम ३६० नुसार तपास सुरू होता.तपासा दरम्यान माहिती मिळाल्या नंतर पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद जिल्ह्यात आरोपी मोहम्मद शेख उर्फ अली आणि मुलगी मिळून आली.

हिललाईन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनीआरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस रोमांड देण्यात आलंआहे. अधिक तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply