उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रयत्नांनी दुबईतील १६४ महाराष्ट्रीय नागरिक विशेष विमानाने मुंबईत परतणार

image

या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर या भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता.

'तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,', असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *