उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द

मुंबई : राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी  एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते पद म्हणून मान्यता रद्द केली आहे. आता त्याजागी पुन्हा एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे. तसेच आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव शिवदर्शन साठ्ये यांनी दिली. हा निर्णय उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply