उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदचे संकेत; म्हणाले, “ केंद्राने महाराष्ट्रात पाठवलेले सॅम्पल घरी पाठवावे, अन्यथा चांगलं वृद्धाश्रम असेल तिकडे पाठवा,”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवलं नाहीतर महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. असंच चालत राहिलं, तर आपल्या शूरवीर राज्याच्य अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जातील. आपल्याला फक्त मग बघत बसावे लागले. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवला पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद करण्याचं देखील पाहू, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

“भाजपातील महाराष्ट्रातील प्रेमींनी बरोबर यावे. कारण पक्षीय राजकारणात अस्मिता आणि राज्य चिरडलं जात असेल, तर आपण छत्रपतींचे नाव घेण्यास नालायक आहोत. दोन चार दिवसांत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. केंद्राने महाराष्ट्रात पाठवलेले सॅम्पल घरी पाठवावे, अन्यथा चांगलं वृद्धाश्रम असेल तिकडे पाठवा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. पण, त्यांचा अपमान झाळ्यावर भाजपाकडून गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. केंद्रात ज्यांचं सरकार आहे, त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. या माणसांची कुवत काय असते, यांची पात्रता काय असते? यांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही. त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणे मी सोडून दिलं आहे,” असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply