उदयनराजे भोसले : शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलेलं बरं; पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले भावुक

Udayanraje Bhosale : राज्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील पत्रकार परिषदेत राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. 'शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलेलं बरं' असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले या पत्रकार परिषदेत भावुक झाले.

प्रत्येक कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा असते. पण नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात विकृत वक्तव्य, चित्रपट असेल यातून जेव्हा जेव्हा अवहेलना केली जाते. गलिच्छ चित्र निर्माण केलं जातं तेव्हा राग कसा येत नाही ? असा सवाल त्यांनी सर्वच पक्षांना केला. शिवाजी महाराजांच नाव घेता तेव्हा मनात एकच अजेंडा असतो. महाराजांचा अदर पण तसं नसेलच तर मग शिवाजी महाराजांच नाव तरी कशाला घ्यायचं, असंही यावेळी उदयनराजे म्हणाले.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *