उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! पर्यटकांनी भरलेली व्हॅन दरीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

Uttarakhand Accident News : उत्तराखंडमधून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. जोशीमठ येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. पर्यटकांनी खचाखच्च भरलेली व्हॅन अचानक दरीत कोसळली. या घटनेत १२ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हॅनमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, जोशीमठ ब्लॉकच्या उरगम-पल्ला जाखोला हायवेवर हा अपघात झाला आहे. चालकाचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणारी व्हॅन थेट खोल दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना, पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबल यांच्यासह एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले असूनही व्हॅनमध्ये काही लोक अडकून पडले आहेत. त्यांना रेस्कू करण्याचे काम सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply