आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक; १ ऑगस्टपासून राज्यात मोहिमेस सुरुवात

आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून यासंबंधी मोहिम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने जर आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली मोहिमेस सुरुवात

भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली या मोहीमेस सुरुवात होणार आहे. आधार कार्डची माहि मती आयडेंटिटी कार्डच्या माहितीशी लिंक केल्याने मतदारांची खासगी माहिती वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल. त्यानंतर मतदारांवर मर्यादा येतील. म्हणजेच, मतदारांना आता त्यांचे संबंधित आधार तपशील सादर करून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर आपली ओळख प्रस्तापित करावी लागेल. मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एकाच व्यक्तीच्या नावे असलेली जास्तीची मतदार ओळखपत्रे काढून टाकण्यात येणार

या मोहिमेअंतर्गत एकाच व्यक्तीच्या नावे असलेली जास्तीची मतदार ओळखपत्रे काढून टाकण्यात येणार आहेत. ही मोहिम केंद्र सरकारच्या निवडणूक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुधारित कायद्यानुसार, निवडणूक नोंदणी अधिकारी कोणत्याही व्यक्तीकडून त्याचा आधार क्रमांक मागू शकतात. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही घेण्यात आली होती. त्यावेळी आधार कार्ड किंवा क्रमांक हे केवळ व्यक्तीची ओळख सिद्ध करणारी कागदपत्र असून ही कागदपत्रे नागरिकत्वाचा आधार नसल्याचे न्यायालयाने म्हणले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply