आंध्रात 13 नव्या जिल्ह्यांचा उदय; जगन मोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय

गुंटूर : जगन मोहन रेड्डी  सरकारनं आज (सोमवार) आंध्र प्रदेशमध्ये  13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केलीय. त्यामुळं राज्यातील एकूण जिल्ह्यांची  संख्या विद्यमान 13 वरून 26 झालीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्लीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 13 नवीन जिल्ह्यांचा शुभारंभ केला. सर्व नवीन जिल्हे 4 एप्रिलपासून अस्तित्वात येतील, असं 2 एप्रिलच्या रात्री जारी करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेत म्हंटलंय.  

मुख्यमंत्री जगन यांनी अधिकाऱ्यांना नवीन जिल्ह्यांची कार्यालय वाटप प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिलेत. अधिकाऱ्यांना 4 एप्रिल रोजी सर्व नवीन 13 जिल्हा कार्यालयात हजेरी नोंदवून कामकाज सुरू करण्यास सांगितलंय. मुख्यमंत्री जगन हे 6 एप्रिल रोजी सर्व गाव आणि प्रभाग सचिवालयांमध्ये 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अथकपणे काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सत्कार करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री 8 एप्रिलला राज्यभरातील लाभार्थ्यांना घरं वाटप करणार आहेत.

नवीन जिल्ह्यांबाबत अधिसूचना जारी झाल्यानंतर, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारनं  राज्याच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फेरबदल केली आणि नव्यानं निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची नियुक्ती केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जगन रेड्डी यांनी नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं होतं.

आंध्र प्रदेशातील 26 जिल्ह्यांची संपूर्ण यादी

• विजयनगरम जिल्हा हा मान्यममधून नवीन जिल्हा म्हणून तयार करण्यात आलाय.

• अनाकापल्ली जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यापासून बनविला गेलाय.

• अल्लुरी सीताराम राजू जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये कोरला गेलाय.

• काकीनाडा हा नवीन जिल्हा पूर्व गोदावरी जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• नवीन जिल्हा कोनसीमा पूर्व गोदावरी जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• पश्चिम गोदावरी जिल्ह्यामधून एलुरु हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलाय.

• नवा जिल्हा पलनाडू गुंटूर जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• बापटला हा नवा जिल्हा गुंटूर जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• नांदयाल हा नवा जिल्हा कुर्नूल जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• अनंतपूर जिल्ह्यातून श्री सत्य साईंचा नवा जिल्हा तयार करण्यात आलाय.

• चित्तूर जिल्ह्यातून श्री बालाजी हा नवा जिल्हा तयार करण्यात आलाय.

• अन्नामाय हा नवीन जिल्हा कुडप्पाह जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.

• नवा जिल्हा एनटी रामाराव कृष्णा जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply