अमृतसर : शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अमृतसर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे निदर्शने करत होते. त्यावेळी गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली असून आरोपीनं कबुली दिली आहे. 

पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अमृतसरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुधीर सुरी हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply